¡Sorpréndeme!

'या' हनुमंताच्या मंदिरात तीन दिवस थांबलं तर सर्पदंश लगेच बरा होतो! नवसाला पावणारा हनुमंताची अनोखी आख्यायिका

2025-04-26 31 Dailymotion

बीड: जिल्ह्यातील पांगरी गावात नवसाला पावणाऱ्या हनुमंताच्या यात्रेला (Pangri Hanuman Temple) सुरुवात झाली आहे. नवसाला पावणारा हनुमंत असल्याने नवसपूर्तीसाठी आणि अष्टमीनिमित्त लाखों भाविक-भक्तांनी हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. गावातील दोनशे तरुणांनी अनवाणी पायांनी गंगेवरून कावडीने पाणी आणत हनुमंताचा अभिषेक करून पूजा केली. या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हनुमंताचा उत्सव साजरा करतात. यावेळी गुलाबांची उधळण करून कावडीची मिरवणूक काढण्यात आली. 



हनुमंताची आहे अनोखी आख्यायिका: एखाद्याला सर्पदंश झाला तर पांगरी गावातील हनुमंताच्या मंदिरात येऊन तीन दिवस थांबले तर सर्पदंश उत्तरला जातो अशी श्रद्धा आहे. तर आध्यात्मिक आणि विज्ञानाची जोड देत गावकरी आजही ही परंपरा पाळत आहेत. तसेच येथे वैद्यकीय उपचार देखील केले जात असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तर गावातील मंदिराचा विकास सरकारने करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय.